अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यभरात प्रचंड पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर यांसारख्या प्रमुख पिकांची पेरणी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.दरम्यान, समाज माध्यमांवर एका शेतमजूर महिलेने शेतकऱ्यांची व्यथा मांडणारं गीत गायलं असून ते गीत प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, संकटं आणि असहायता या गीतातून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.यामुळे अनेक शेतकरी वर्ग आणि समाजाती