अति पावसानंतर सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचं संकट . वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर आता सोयाबीन पिकावर येल्लो मोझॅक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहलय. मोझॅकमुळं सोयाबीनची पानं पिवळी पडत असून पीक सुकतंय त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.