आज शुक्रवारी सकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे दिग्रस शहरातील धावंडा नदीला पुन्हा पूर आला. तसेच आज दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान निंभा शेत शिवारासह अनेक शिवारातील नदी नाल्याला पूर आले. यात निंभा शेत शिवारातील काही शेतात नाल्याचे पाणी घुसल्याने सोयाबीन, कापूस सह अनेक शेतीपिकाचे नुकसान झाले. तसेच दिग्रस तालुक्यातील अनेक शेत शिवारात पाणी घुसल्याने पिके खरडून गेल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात आला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.