कोल्हापूर-सांगली मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंकली गावच्या हद्दीत नदीपात्रात सापडला असल्याची माहिती आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता हजारे कुटुंबियांनी दिली.मृत अनिता अरविंद हजारे (वय ४७, मुळगाव अग्रण धुळगाव,जि.सांगली,सध्या राहणार उचगाव, कोल्हापूर) या महिलेने आपल्या पतीसोबत दुचाकीवरून सांगलीकडून - कोल्हापूरकडे येताना कृष्णा नदीच्या पात्रात उडी मारली होती.