आडगाव शिवारात इच्छामणी नगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी 1 लाख 73 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रुंजाजी भालेकर राहणार इच्छामणी नगर अंकुश अपार्टमेंट आडगाव शिवार यांच्या घराचा लाकडी दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.कपाटातील सोन्याची पोत,सोन्याची चैन, सोन्याचे नाकातील मुरली,70 हजारांची रोकड चोरी करून नेली.