तालुक्यातील वाघरे गावात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान मोठ्या हाणामारीत झाले. या वादात मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला, तर त्याच्या नातेवाईकांनाही लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून, या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.