पाचोरा शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शनिवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता जळगाव-पाचोरा रोडवर पोलिसांनी सापळा रचून दीड लाखाचा गांजा आणि गांजा वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींनाही अटक केली असून, त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दिली आहे.