पती सोबत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत कुरई येथे बुधवार, दि. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. कविता विजय परसुटकार (33) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपुर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात वणी येथे पाठविले.