मिलत नगर येथून ३६ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेदरम्यान उघडकीस आली.या प्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून हरवल्याची नोंद केली आहे. मिलत नगर येथील जावीद खान जाफर खान वय ३६ वर्ष हे पत्नीला असे सांगून गेले की मी,हॉटेलमधून जेवण करून येतो, तू स्वयंपाक करू नको "असे सांगून बाहेर निघून गेले ते उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच मिळून आले नाही. यामुळे वहिदा बी जावीद खान यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.