आज दि पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि कन्नड तालुक्यातील सारोळा येथे एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. आरोपी अंकुश जनार्धन लेणेकर (२९) याने मुलीला फोनवर जीव घेण्याची धमकी देऊन शेतात नेले. तेथे जबरदस्ती केल्यानंतर कुणाला सांगितले तर आत्महत्या करीन, अशी धमकी दिली. घटनेनंतर मुलीने कुटुंबीयांना प्रकार सांगितला आणि पोलिसांत फिर्याद नोंदली. पिशोर पोलिसांनी आरोपीवर पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल केला.