जळगाव शहरातील पाटीलवाडा परिसरात राहणारा २२ वर्षीय तरुण हा कामावर जात असल्याचे सांगून तो २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून बेपत्ता झाला आहे. याबाबत शनिवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. निकेतन सुनील वाणी वय 22 रा. पाटीलवाडा जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.