पोपटखेड रोड मार्गावरील एलआयसी कार्यालय येथे 69 व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी विमा सप्ताह कार्यक्रम चे उद्घाटन पार पडले १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान एलआयसीचा विमा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत सातही दिवस विविध कार्यक्रम पार पडणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन वरिष्ठ शाखा प्रबंधक प्रकाश अलोने, विक्री विभागाचे अधिकारी उमेश ठाकरे नव व्यवसाय विभागाचे प्रल्हाद होळंबे सर्व विकास अधिकारी एलआयसी अभिकर्ता,ग्राहक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.