दोंडाईचा शहराजवळी बळसाने गावात फोर व्हीलर च्या, धडकेत एक जण गंभीर जखमी. डोंगरसिंग भाऊसाहेब गिरासे वय 30 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी रस्त्याने पायी चालत असताना मागून येणारे फोर व्हीलर क्रमांक एम एच 39 ए क्यू 0025 गाडीतील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मला मागून धडक देत माझा उजवा पायावर गाडी चालवत मला गंभीर दुखापत केली. यावरून सदर फोर व्हीलर च्या अज्ञात चालकाचे नाव माहित नाही. यावरून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.