धर्माबाद तालुक्यातील मनूर संगम बामणी विळेगाव ह्या गावांना गोदावरी नदीच्या पाण्यामुळे विळखा बसला असून त्यातल्या त्यात संगम हे गाव तीन नदीचे संगम असलेले ठिकाण असून ह्या ठिकाणी गोदावरी हरिद्रा व मांजरा ह्या तीन नद्यांचा संगम होतो, सध्याला सुरु असलेल्या ढगफुटी व पोचमपहाड डॅममधून हळू हळू सुरु असलेला विसर्ग यासह गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्याने मनूर संगम ह्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून गावकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडिआरएफ च्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.