रत्नागिरी : बदलती जीवनशैली, ताणतणाव व अयोग्य आहार यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. अचानक हृदयविकार झाल्यास, वेळेवर cpr केल्यास व्यक्तीची जीवन वाचण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.CPR चे ज्ञान आणि कौशल्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने CPR चे महत्त्व जाणून घेणे आणि त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्धआठल्ये यांनी केले आहे.यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये cpr प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.