राज्यातील सेतु आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी आज रोजी एकदिवसीय बंदचे आयोजन केले. शासनाच्या धोरणांमुळे सेतु केंद्रे बंद होण्याची वेळ आल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान Whatsapp चॅटबॉटवर महसूल सेवा देणे, महाविद्यालयांमध्ये नवीन केंद्र सुरू करणे, 'आपले सरकार ओपन पोर्टल' सुरू ठेवणे यास संघटनेचा तीव्र विरोध आहे. हे निर्णय रद्द करावेत, केंद्र चालकांना सुरक्षा द्यावी, वेळेवर कमिशन मिळावे, तसेच आधार सेवा केंद्रासाठी अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.