विश्वमित्र नदीला पूर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, मदतीची अपेक्षा अकोल्याच्या पातुर तालुक्यातील मळसुर, झरंडी परिसरात विश्वमित्र नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, ही स्थिती गेल्या वीस वर्षांतील सर्वात भीषण असल्याचे म्हटलं जात आहे. या पुरामुळे शेकडो एकरवरील सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी.