आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी लसाकम (लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मातंग समाजावर जातीय द्वेषभावनेतूनच वाढत चाललेल्या हल्याप्रकरणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आज एक निवेदन सादर केले आहे. या संदर्भात लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हाध्यक्ष विजय रणखांब यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया द्वारे सविस्तर माहिती दिली आहे.