दिग्रस शहरातील शंकर टॉकीज परिसरात बैलपोळा उत्सव दि. २२ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची पारंपरिक व आकर्षक सजवट करून मिरवणुकीत सहभाग घेतला. राजकीय व शेतकरी झडत्यांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पोळा उत्सवाच्या निमित्ताने परिसरात विविध प्रकारची दुकाने उभारण्यात आली होती. आकर्षक सजावट, रोषणाई व ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या सोहळ्याने परिसर दणाणून गेले.