पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेली देशातील पहिली अमृतभारत एक्सप्रेस सुरत ते ओडिशा या सात राज्यांना जोडत अकोल्यातून धावली. या रेल्वेचा थांबा अकोल्याला मिळाल्याने भाजपातर्फे रेल्वे स्थानकावर दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 9 वाजता जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जयंत मसने, विजय अग्रवाल यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धोत्रे म्हणाले, "ही रेल्वे अकोल्यासाठी अभिमानाची बाब असून केंद्र सरकार सबका