कोल्हापूर सांगली मार्गावरील मौजे वडगाव फाटा येथे आज सोमवार, दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एका थांबलेल्या रिक्षाला भरधाव बलेनो कारने जोराची धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले.या अपघातामध्ये दोन कार व रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर उचगाव येथील रिक्षाचालक भाडे घेऊन मिरजेकडे गेला होता.