बेकायदेशीर रित्या प्राणघातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने महात्मा नगर येथील एका हॉटेल मधून ताब्यात घेतले आहे.अंबड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक सराईत आरोपी प्रिन्स चित्रसेन सिंग हा महात्मा नगर येथील एका हॉटेलमध्ये थांबलेला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.