सातारा- पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नीरा येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकींवर भगवे झेंडे लावून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषणा देत आलेल्या १० ते १५ जणांनी आपणास दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. लोणंद येथे सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना त्यांनी घडल्या प्रसंगाची माहिती दिली. पुणे ग्रामीण आणि सातारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप पोहोचवले.