डोणज येथे शेतातील फुटलेली पाईप बसविण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एका व्यक्तीने पती-पत्नीस काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी दत्तात्रय सिताराम शिंदे याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना राजेंद्र शिंदे (वय ३२, रा. डोणज) व त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी घरासमोर होते.