जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भास्कर जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली दि.19/06/2025 रोजी मुख, स्तन, गर्भाशय मुख कॅन्सर करिता कॅन्सर डायगोन्स्टीक व्हॅन द्वारे तपासणी व जनजागृती शिबिराचा शुभारंभ स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे माजी नगरसेविका स्मितल पावसकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख बिपीन बंदरकर,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.विकास कुमरे,वैद्यकीय आधिकारी स्रीरोग तज्ञ डॉ.सचिन साळुंखे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. यश प्रसादे, दंतवैद्य डॉ. शुभदा बडवे, वालावलकर रुग्णालय डेरवणचे डॉ. धनंजय दुमणवार, डॉ. रसिका शिरसाट, डॉ. रसिका आंबेडकर आदी उपस्थित होते.