पाचोरा तालुक्यातील हडसन येथील शेतकरी देविदास दामु पाटील यांच्या हडसन शेत शिवारातील शेत गट.न.५१/१ या 4 एकर श्रेत्रावरील मका पिकाचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, शेतकरी आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी पहाटे 7 वाजच्या सुमारास शेतात पोहचला असता शेतकऱ्याच्या ते निदर्शनास आले, या मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्याच्या या समस्येकडे वनविभाग तसेच संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.