२३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीची निवड अलिबाग येथील भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. "नवी कार्यकारिणी, नवा जोश" या घोषणेसह झालेल्या या संघटनात्मक बैठकीत युवा कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस व कार्यकारिणी सदस्य या पदांवर युवा कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली.