तुळजापूर बस स्थानकामध्ये वृद्ध व्यक्तीची पिशवी कापून एक लाख रुपये कॅश लंपास केल्याची दुर्दैवी घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे. मल्लीनाथ बाबुराव कोनाळे (वय ७५, राहिवासी किलज) यांनी स्थानिक एसबीआय शाखेतून पैसे काढून आल्यानंतर हा प्रकार घडला, कोनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तुळजापूर पोलिसांच्या वतीने ३० ऑगस्ट रोजी सहा वाजता देण्यात आली.