वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. कोडोली गावाजवळ अरुणावती नदीला मोठा पूर आला असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाहत आहे.नदीच्या पाण्याने दुधारी स्वरूप घेतल्याने परिसरातील नागरिक पूर पाहण्यासाठी कोडोली पुलावर मोठ्या संख्येने जमले आहेत. पाण्याच्या प्रचंड लाटांनी नदी परिसरात थरारक दृश्य निर्माण झाले आहे.