मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज मंगळवार 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी मुंबई येथील आझाद मैदानावरून आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केल्यानंतर परभणीत सकल मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात फटाक्यांची भव्य आतिषबाजी, गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.