हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10-30वा. सुमारास खाजगी बस क्रमांक एम एच 43 एक्स 8124 च्या चालकांने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालून ब्रेक मारली त्यामध्ये पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने,दुचाकी वरील तिघेजण गंभीर जखमी झाले तर अन्य एका 2 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सदर बस चालकावर आ.बाळापुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे.