: पौड रोडलगत असलेल्या कृष्ण हॉस्पिटलला स्वतंत्र पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात पार्किंगची सोय नसल्याने ॲम्बुलन्सच रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थांबवावी लागते. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होते. आपत्कालीन सेवेसाठी धावणाऱ्या ॲम्बुलन्सलाच थांबावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालय प्रशासनाने पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक करत आहेत