शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्राम रोजगार सेवक संघटनेने ८ सप्टेंबरपासुन बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनामुळे शासनाच्या विविध योजनांची कामे प्रभावित होण्याची भीती वर्तविली जात आहे. रोजगार सेवकांचे मानधन रखडले आहे.यासह अन्य मागण्या देखील प्रलंबित आहेत. त्या अनुषंगाने आज दि ८ सप्टेंबरला १२ वाजता ग्राम रोजगार सेवकांनी निवेदन दिले आहे.