चांदूरबाजार तालुक्यातील थूगाव येथे अवैध रेतीची वाहतूक थांबवण्याचे प्रयत्न केले असता, महसूल अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना दिनांक 28 ऑगस्टला सकाळी साडेअकरा वाजता चे दरम्यान घडली आहे. याबाबतीत महसूल अधिकारी विश्वजीत दिलीप बंगरे यांनी दिनांक 28 ऑगस्टला रात्री आठ वाजून 41 मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास चालू बाजार पोलिसांकडून सुरू आहे