गोकुल वाढीव माईन्स प्रकल्पासाठी खंडाळझरी येथील शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. या जमीन संपादनामुळे संपूर्ण खंडाळझरी गाव बाधित होणार आहे. या प्रकल्पाचा थेट परिणाम होणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता आणि अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंचायत समिती उपसभापती राहूल मसराम यांच्या नेतृत्वात आज २२ जून रविवारला दुपारी तीन वाजता बैठक घेण्