सावंतवाडी येथील सर्वोदय नगर आणि शिरोडा नाका परिसरातील तीन बंद फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. विशेष म्हणजे सर्वोदय नगरात तोडांला रूमाल बांधून फिरताना हे दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिस त्यांचा तपास करत आहेत. हा प्रकार आज शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आला अशी माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली.