लातूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आर्थिक स्वावलंबी करत त्यांना जगण्याचे बळ दिले, त्यांचा सन्मान वाढवला या भावनेतून लातुर जिल्हयातील हजारो बहीणींनी आपले लाडके 'देवाभाऊ' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाचे निमीत्त साधत राख्यांच्या माध्यमातून भरभरुन आशीर्वाद दिले असल्याचे मत भाजपा लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केले. अशी माहिती आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकार देण्यात आले आहे.