गडचिरोली मूल राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 10 मेंढ्या चिरडल्या गेल्या. तसेच दोन मेंढीपाळही जखमी झाले. रवि अल्लीवार वय, 38 वर्ष मुल, रामाजी अल्लीवार वय, 62 वर्ष रा. गडीसुर्ला ता. मुल अशी जखमींची नाव आहेत.मुल येथील रवि अल्लीवार आणि रामाजी अल्लीवार हे दोघे मेंढपाळ रविवारी रात्रौ मेंढ्यांचा कळप घेऊन गडचिरोली कडून मुल कडे राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत होते.