चिखलदरा धारणी मार्गावरील जुटपाणी टेंबली रस्त्यावर आज सकाळी ७ वाजता काही ग्रामस्थ मॉर्निंग वॉक करीत असताना एक महिला संशयास्पद व बेशुद्धावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला फोन केला असता अर्धा तास उलटून ही रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली नाही, रुग्णवाहिका न आल्याने त्या महिलेला खाजगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे भरती करण्यात आले.भाजपचे पदाधिकारी शिवकुमार उर्फ राजा पाटील हे टेंबली येथील त्यांच्या सहकाऱ्यांसह सकाळी मॉर्निंग वॉक करीत होते.