भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ परिणय फुके यांनी दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजता दरम्यान विविध मंडळांना भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा केला तसेच यावेळी आमदार फुके यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.