अतिवृष्टीमुळे शहरातील गवराळा प्रभागातील कांताबाई लांडगे,सुवर्णा राजगडकर,राजु बोढेकार व लिंगन्ना यांची घरे दिनांक २ रोज मंगळवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास काही फरकाने कोसळली. या घटनेत कांताबाई लांडगे हि विधवा महिला जखमी झाली.घरे कोसळल्याने घरातील साहित्य व अन्नधान्य मलब्याखाली दबून नुकसान झाले.ग्रामविकास अधिकारी प्रिती कोटांगळे यांनी घटनांचे पंचनामे करुन अहवाल वरीष्ठांना पाठविला.प्रभावित नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी नागरीकांकडून करण्यात आली आहे.