पूर्व विदर्भातील प्रसिद्ध हनुमान देवस्थान चांदपुर येथे आज दि. 13 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 2 वा. बालविवाह जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन इंडियन वेल्फेअर सोसायटी भंडारा यांच्या वतीने करण्यात आले. बालविवाह मुक्त या अभियानाला इंडियन वेल्फेअर सोसायटीचे भंडारा जिल्हा समन्वयक अमोल पानतावणे यांच्या उपस्थितीत चांदपूर देवस्थानचे पदाधिकारी तसेच शेकडो भाविक भक्तांनी बालविवाह रोखण्यासाठी शपथ घेतली. याप्रसंगी हनुमान देवस्थानचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.