कोयना वारणा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना आणि वारणा धरणातून गेल्या दोन दिवसांपासून विसर्ग वाढविण्यात आला होता आहे कोयनेतून 1 लाख क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते तर वारणा धरणातून 46 हजार क्यूसेस पाणी नदी पात्रात सोडण्यात येत होते दोन्ही धरणातून कृष्णा नदीपात्रात दीड लाख क्यूसेस पाणी येत असल्याने गेल्या तीन दिवसात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे अनेक सखल आणि पुरपट्ट्यात आता कृष्णेचे पाणी शिरत असताना सांगलीत कृष्णा नदीने आता इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटच