धुळे शहरातील क्यूमाईन क्लबसमोर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व विविध ओबीसी संघटनांच्या वतीने ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आमरण उपोषण सुरू झाले आहे. महानगर प्रमुख उमेश धर्मदास महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. “मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण ओबीसी प्रवर्गातून नव्हे” या मागणीसाठी आंदोलन पुकारले असून, ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.