बनावट कागदपत्रे वापरून बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची 19 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या तपासणीत श्रीकांत आलाट यांनी दिलेली बिले बनावट होती आणि आगीत कोणताही माल जळाला नसल्याचं उघडकीस आल आहे. याप्रकरणी पोलिसांनी श्रीकांत इंद्रजीत आलाट यांच्याविरोधात 24 दुपारी दीडच्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.