महामार्ग उभारणीस हिरवी झेंडी मिळाल्याने मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्र्यांचे खा.प्रफुल पटेल यांनी आभार मानले. नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गास आणि त्यासाठीच्या भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे या महामार्गाच्या कामाला गती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द्रुतगती महामार्ग नागपूरपासून गोंदिया पर्यंत उभारण्यात यावा यासाठी खा.श्री प्रफुल पटेल यांनी सतत पाठपुरावा केला होता.