देवगाव येथील गजानन शंकरराव ढवळे वय 42 वर्ष यांचा मृतदेह गावशेजारील मोरे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. गजानन ढवळे हे दिनांक 26 सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून शोध घेण्यात येत असताना त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला.प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.