श्रीगोंदे तालुक्यातील निमगांव खलू येथील प्रस्तावित दालमिया इंडिया ग्रीन व्हिजन लिमिटेडच्या ६० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या सिमेंट स्टँडअलोन ग्राइंडिंग युनिट प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणामांचा विचार करता हा प्रकल्प स्थलांतरीत करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन केली.