आज दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास समाज माध्यमावरील विविध ग्रुपवर नांदेड शहरातील हिंगोली गेट येथील भुयारी मार्गात मगर दिसत असल्याचा व्हीडिओ व्हायरल होताना दिसत असून हा व्हीडिओ कुठला याची पडताळणी केली असता हा व्हीडिओ नांदेड येथील हिंगोली गेट परिसर तर सोडाच पण अजून कुठल्याच भुयारी रस्त्याचे बांधकाम व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या बांधकामाप्रमाणे नाही या शिवाय व्हीडिओत येणारा आवाज देखील नांदेड शहरातील बोली भाषाप्रमाणे नाही यामुळे व्हायरल होणारा व्हीडिओ हा नांदेडचा नसल्याचे सिद्ध होते आहे.