दुचाकीने जात असताना कुत्रा आडवा आल्याने दुचाकी वरून पडल्याने अपघात होऊन एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना तिंत्रव फाट्याजवळ दिनांक ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की शेगाव तालुक्यातील विशंबर तुकाराम इंगळे वय ५६ वर्ष हे त्यांच्या दुचाकीने खामगाव कडे येत असताना कुत्रा अचानक दुचाकी समोर आला व अपघात होऊन विश्वंभर इंगळे खाली पडले. या अपघातात ते गंभीरित्या जखमी झाले होते.त्यांना नागरिकांनी लगेच खामगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले.